आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी श्रेणीसुधार, पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

ICSE, : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE) म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. सीआयएससीईच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार दोन्ही परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. टाइमटेबलनुसार, इयत्ता दहावीसाठी कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होCतील आणि ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहतील. इयत्ता बारावीसाठी कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरु होतील आणि ७ सप्टेंबर २०२१ रोजी समाप्त होईल. दोन्ही परीक्षांच निकाल २० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल. महत्त्वाच्या तारखा आयसीएसई परीक्षांचे आयोजन- १६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२१ आयएसई परीक्षांचे आयोजन- १६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२१ बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रक इयत्ता दहावीच्या इम्प्रूव्हमेंट आणि कंपार्टमेंट परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तर पुरवणी किंवी कंपार्टमेंट परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे दिली जातील. गुण आणि पास प्रमाणपत्रांचा तपशील उमेदवारांच्या शाळांमध्ये पाठवण्यात येईल. यानंतर विद्यार्थी आपल्या शाळांकडून मार्कशीट आणि अन्य प्रमाणपत्र एकत्रित घेऊ शकतात. यावर्षी CISCE ने कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षीICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती. विद्यार्थी लेटेस्ट अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X64bSf
via IFTTT

Post a Comment

0 Comments