Also visit www.atgnews.com
Maharashtra Board: दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखा जाहीर
SSC, HSC Supplementary Examination: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखांबद्दल माहिती देण्यात आली आहे. करोनामुळे महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या दहावी, बरावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर झाला. जुलै-ऑगस्टमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट ऐवजी त्यानंतर घेण्यात येणार आहे. दहावी, बारावीचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of credit घेणारे विद्यार्थी) तसेच तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी नियमित शुल्कासह ११ ते १८ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. तसेच विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करु शकतात. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २३ ते २४ ऑगस्टदरम्यान बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरायचा आहे. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २५ ऑगस्टपर्यंत विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत. मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन माध्यमातून हे अर्ज भरायचे आहेत. तसेच या तारखांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m098GL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments