Also visit www.atgnews.com
युनियन बॅंकमध्ये विविध पदांच्या ३४७ जागा रिक्त
Recruitment 2021: बॅंकेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. युनियन बॅंक भवन,केंद्रीय कार्यालय, मुंबईतर्फे जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार युनियन बॅंक भरती प्रकल्प २०२१-२२ पदभरती अंतर्गत विशेष अधिकारींची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता), व्यवस्थापक (वास्तुविशारद), व्यवस्थापक (विद्युत अभियंता), व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ), व्यवस्थापक (फोरेक्स), व्यवस्थापक (सनदी लेखपाल), सहायक व्यवस्थापक (तंत्र अधिकारी), सहायक व्यवस्थापक (फॉरेक्स) या दहा पदांअतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशिल वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम)ची एमएमजीएस-III श्रेणीअंतर्गत येणारी ६० पदे रिक्त व्यवस्थापक (जोखीम) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारी ६० पदे रिक्त व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारी ७ पदे रिक्त व्यवस्थापक (वास्तुविशारद) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारी ७ पदे रिक्त व्यवस्थापक (विद्युत अभियंता) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारी २ पदे रिक्त व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारे १ पद रिक्त व्यवस्थापक (फोरेक्स) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारी ५० पदे रिक्त व्यवस्थापक (सनदी लेखपाल) एमएमजीएस-II श्रेणीअंतर्गत येणारी १४ पदे रिक्त सहायक व्यवस्थापक (तंत्र अधिकारी) जेएमजीएस)-I श्रेणीअंतर्गत येणारी २६ पदे रिक्त सहायक व्यवस्थापक (फोरेक्स) जेएमजीएस)-I श्रेणी अंतर्गत येणारी १२० पदे रिक्त शेवटची तारीख युनियन बॅंक भरती प्रकल्प २०२१-२२ अंतर्गत अशा एकूण ३४७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी बॅकेंतर्फे महत्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार १२ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरणे, सूचना शुल्क भरु शकतात. ३ सप्टेंबर ही अर्ज आणि शुल्क भरण्याची अखेरची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज कुठे पाठवाल? उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी बॅंकेची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/1eIVmf3 वर जावे लागेल. त्यातील रिक्रूटमेंट आणि करिअर सेक्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला पदभरतीचे नोटिफिकेशन वाचता येईल. नोटिफिकेशन वाचा इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, पगार यासंदर्भातील माहिती जाणून घ्यावी. त्यानंतर अर्ज भरावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास तो रद्द करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fYCFwr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments