Also visit www.atgnews.com
अकरावी प्रवेशांच्या पहिल्या फेरीनंतर ८० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या यादीत प्रवेशास पात्र ठरलेल्या एक लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. याचबरोबर विविध कोट्यांमध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थी मिळून एकूण ८० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश निश्चित झाले आहेत. आता दुसरी गुणवत्ता यादी ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी यावर्षी मुंबई विभागात अर्ज केलेल्या दोन लाख दोन हजार ३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या यादीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थी पहिल्या यादीत प्रवेशास पात्र ठरले होते. यापैकी ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीचा पर्याय निवडला आहे. तर पहिला पसंती क्रमाचे कॉलेज मिळवलेल्या ६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले तर सुमारे १० हजार ५१५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेलेच नसल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना आता नियमित प्रवेश फेऱ्या पार पडल्यानंतर विशेष फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या विविध कोट्यातील आणि केंद्रीय कोट्यातील प्रवेशांमध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या सुमारे ६९ हजार २९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर आयसीएसई शिक्षण मंडळाच्या सहा हजार ९७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या फेरीचे यादीचे वेळापत्रक - १ ते २ सप्टेंबर (रात्री ८ वाजेपर्यंत) - अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला भाग संपादित करणे. भाग दोन भरणे. - ३ सप्टेंबर - माहिती प्रक्रिया करणे - ४ सप्टेंबर - सकाळी १० वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणे. - ४ ते ६ सप्टेंबर - कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. आतापर्यंत झालेले कोटानिहाय प्रवेश कोटाविद्यार्थी केंद्रीय५८५०६ इन-हाउस ७२७२ अल्पसंख्याक १३७४६ व्यवस्थापन ८७१ एकूण ८०३९५
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jxoIrz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments