Maharashtra TET 2021 साठी नोंदणीची तारीख वाढवली, 'असा' करा अर्ज

: महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती (Teacher jobs) साठी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MAHATET 2021) अद्याप ज्या उमेदवारांनी अर्ज केला नाहीय त्यांच्यासाठी संधी आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट काऊन्सिल ऑफ एक्झामिनेशनने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या नोटिफिकेशननुसार ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल ते महाराष्ट्र टीईटी २०२१ साठी अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करु शकता. महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. नोंदणी प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. २५ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख होती. पण (Maharashtra TET 2021) अर्ज करण्याची तारीख ५ सप्टेंबर करण्यात आली आहे. MAHATET 2021 साठी असा करा अर्ज स्टेप १ - अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जा. स्टेप २- होमपेजवर 'महाटी २०२१ ऑपरेशन' अंतर्गत 'नवी नोंदणी' वर क्लिक करा स्टेप ३- रजिस्टर करा आणि पोर्टलवर लॉगिन करा स्टेप ४ - महत्वाची माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरुन पेमेंट करा स्टेप ५- फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिटंआऊट काढून घ्या सन २०१८-१९ नंतर आता परीक्षा होणार आहेत. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता शिक्षणविभागाकडून वर्तविली जात आहे. टीईटी अनिवार्य इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी(TET) अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत आणि कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t1uC7z
via IFTTT

Post a Comment

0 Comments