Also visit www.atgnews.com
UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर तपशील
2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सहाय्यक कीपर, प्राचार्य, उपसंचालक आणि मत्स्य संशोधन अधिकारी या पदांच्या जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. यूपीएससीकडून २सप्टेंबर २०२१ रोजी या पदांसाठी नोंदणी विंडो बंद होणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट sc upsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या नोटीफिकेशननुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कामगार आणि रोजगार मंत्रालयात उपसंचालकांची १५१ पदे भरली जाणार आहेत. याव्यतिरिक्त मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि १ मुख्य अधिकारी पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे. महत्वाची तारीख यासंदर्भात १३ ऑगस्टला नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते. २ सप्टेंबर २०२१ पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा कर्मचारी राज्य विमा महामंडळ, श्रम आणि रोजगार मंत्रालयात उपसंचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षे असावे. सहाय्यक कीपर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षे असावे. याशिवाय, SC, ST आणि OBC साठी कमाल वय ३३ वर्षे असावे. त्याचबरोबर प्रिंसिपल ऑफिसर इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ५० वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांन शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. उपसंचालक, सहाय्यक कीपर, प्राचार्य आणि मत्स्य संशोधन संशोधन अधिकारी या पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यातील अटींच्या आधारे अर्ज करावा. अर्ज नियमांचे पालन केले नसेल तर उमेदवाराचा फॉर्म नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t36AZN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments