Also visit www.atgnews.com
देशात जुलैमध्ये ३२ लाख नोकऱ्या गेल्या; १.६ कोटी खराब गुणवत्तेचे रोजगार तयार झाले- रिपोर्ट
In India: जुलै महिन्यात देशातील नोकऱ्या जाण्याची आणि निर्माण होण्याची आकडेवारी समोर आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमी (सीएमआयई) ने हा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार देशामध्ये जुलै महिन्यात ३२ लाख नोकऱ्या गेल्या तसेच याच महिन्यात १.६ कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पण त्या रोजगारांची गुणवत्ता निकृष्ट होती असे यामध्ये म्हटले आहे. सीएमआयईच्या अहवालात विश्लेषण देशात १.८६ कोटी छोटे व्यापारी तसेच रोजंदारीचे मजूर म्हणून काम करत होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) ही माहिती दिली. सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) महेश व्यास यांनी देशातील रोजगारासंदर्भात विश्लेषण केले. त्यामध्ये त्यांनी हे मुद्दे मांडले. चांगली गुणवत्ता आणि उत्तम पगार देणाऱ्या ३२ लाख नोकऱ्या जुलै महिन्यात कमी झाल्या असेही ते यावेळी म्हणाले. शेतीच्या कामांमध्ये वाढ रोजगार जाण्यासोबतच शेतीच्या कामांचे प्रमाण वाढल्याचे देखील ते म्हणाले. कृषी क्षेत्रात रोजगार वाढले याचा अर्थ पेरणीची कामे वाढली आहेत. मान्सून यावेळी लपाछपीचा खेळ खेळत आहे. यामुळे खरीप पेरणीच्या कामांना उशीर झाला आहे. जून २०२१ अखेरपर्यंत खरिपाची पेरणी वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी होती. तर जुलैमध्ये पेरणीचे क्षेत्रफळ ६५.३ कोटी हेक्ट राहीले. जूनमध्ये हे क्षेत्रफळ १.९५ कोटी हेक्टर होते असा मुद्दाही महेश व्यास यांनी आपल्या मुद्द्यांमध्ये मांडला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3g0S8fp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments