कृषी विज्ञान केंद्रात भरती, दहावी पास असणाऱ्यांना संधी

Krishi Vigyan Kendra Recruitment: पुण्यातील बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये पदाचा तपशील, शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा इ. सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत कुशल सहाय्यक कर्मचारी (Skilled Supporting Staff) पदाची भरती केली जाणार आहे. दहावी किंवा समकक्ष इयत्ता पास असणे गरजेचे आहे. यासोबतच गार्डनमध्ये काम करण्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC/PH उमेदवारांना वयाची सवलत देण्यात येणार आहे. उमेदवाराने नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार अर्ज भरायचा आहे. स्वत:ची सही केलेल्या अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता आणि वयाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेकडून पाचशे रुपयांचा डीडी देणे गरजेचे आहे. डीडी , बारामती नावाने असणे गरजेचे आहे. एससी/एसटी आणि महिलांना शुल्क भरण्यातून सवलत देण्यात आली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १८ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. दिलेल्या मुदतीच्यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. टपाल विलंबासाठी केव्हीके व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना उपस्थित राहण्यासाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही. पदभरतीच्या तपशीलासाठी अधिकृत वेबसाइट www.kvkbaramati.com वरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे. २८ ऑगस्ट २०२१ ला यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज पाठविणे गरजेचे आहे. अध्यक्ष, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शरदनगर, मालेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, पिन -४१३११५ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्जावर "सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज" असे लिहिलेले असावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kxC4mX
via IFTTT

Post a Comment

0 Comments