मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ०५ ऑगस्ट २०२१ पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू करण्यात येत आहे. कोणकोणत्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणार ऑनलाइन नोंदणी प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीएमएम, बी.एस.डब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडीज), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडीज), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफ. वाय. बी व्हॉक (इंटेरिअर डिजाईन) एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक - ऑनलाईन अर्ज विक्री – ०५ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट, २०२१ (१.०० वाजेपर्यंत) - प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – ०५ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट, २०२१ (१.०० वाजेपर्यंत) - ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख – ०६ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट, २०२१ (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल. - पहिली मेरीट लिस्ट – १७ ऑगस्ट, २०२१ ( सकाळी ११.०० वाजता) - ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – १८ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट, २०२१ (सायं.३.०० वाजे पर्यंत ) - द्वितीय मेरीट लिस्ट – २५ ऑगस्ट, २०२१ ( सायं. ७.०० वा.) - ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, २०२१ ( सायं.३.०० वाजे पर्यंत) - तृतीय मेरीट लिस्ट - ३० ऑगस्ट, २०२१ ( सायं. ७.०० वा.) -ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – ०१ सप्टेंबर ते ०४ सप्टेंबर, २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rUbjwi
via IFTTT

Post a Comment

0 Comments