Also visit www.atgnews.com
CRPF Recruitment: केंद्रीय राखीव पोलीस दलात २४३९ पॅरामेडिकल स्टाफची भरती
CRPF : सीआरपीएफमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) देशभरातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सीआरपीएफने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, पॅरामेडिकल स्टाफच्या एकूण २४३९ रिक्त पदांसाठी १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत उमेदवारांचे वॉक-इन-इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. सीआरपीएफने निर्धारित केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सीएपीएफ आणि सशस्त्र दलांचे सेवानिवृत्त पुरुष आणि महिला कर्मचारी या वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात. पॅरामेडिकल स्टाफ भरतीसाठी सीआरपीएफने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, ६२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सीएपीएफ आणि एआरमध्ये पॅरामेडिकल कॅडर ड्युटीसाठी एक वर्षासाठी तैनात केले जाणार आहे. पात्रता निकषांविषयी अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. असा करा अर्ज सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार नियोजित तारीख आणि वेळेला मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी येताना त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रांसोबत तसेच फोटोकॉपीसह (सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ.) सोबत आणणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना सर्व तपशीलासह साध्या कागदावर अर्ज द्यावा लागेल. या अर्जामध्ये पदाचे नाव नमूद करावे लागेल. तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो देखील सोबत आणावा लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iF1U8U
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments