UPSC IES/ISS परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'येथे' तपासा

IES/ISS Answer Key 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० च्या जाहीर केल्या आहेत. आयोगाने IES/ISS परीक्षा २०२० च्या दोन्ही पेपरच्या सर्व सेट (A, B, C आणि D)साठी १२ ऑगस्टला अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उत्तरतालिका जाहीर केली. UPSC IES/ISS परीक्षा २०२० मध्ये उपस्थित असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून पेपर १ आणि पेपर २ च्या संबंधित संचांची उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अलीकडेच ३० जुलै २०२१ रोजी UPSC IES, ISS परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन स्वत: चा निकाल तपासू शकतात. आयोगाने १२ ऑगस्ट २०२१ ला भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० च्या जाहीर केलेल्या निकालानुसार एकूण १५उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांची घोषणा केली. त्याचप्रमाणे, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० च्या एकूण ५० उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ११ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० चे नोटिफिकेशन जाहीर केले होते. याची अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबरपर्यंत सुरु होती. निवड प्रक्रियेअंतर्गत परीक्षा १६ ऑक्टोबर २०२० ला घेण्यात आली. २२ जानेवारी २०२१ रोजी निकाल जाहीर करण्यात आले. मुलाखत फेरी झाल्यानंतर ३० जुलै रोजी निकाल आणि १२ ऑगस्ट २०२१ रोजी गुण जाहीर करण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Uhw4FU
via IFTTT

Post a Comment

0 Comments