GAT-B आणि BET परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जारी

NTA GAT-B, BET 2021 admit card: (GAT-B) आणि बायोटेक्नोलॉजी एलिजिबीलिटी टेस्ट (BET) 2021 या परीक्षांचे आयोजन राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे केले जाते. बायोटेक्नॉलॉजीच्या या प्रवेश परीक्षांसाठी एनटीएने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. dbt.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. GAT-B, BET परीक्षा १४ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहेत. कसे डाऊनलोड कराल NTA GAT-B, BET 2021 admit card? स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट dbt.nta.ac.in. वर जा. स्टेप २- 'GAT-B & BET admit card 2021' लिंक वर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४- अॅडमिट कार्ड आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५- अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा. स्टेप ६- भविष्यातली संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची ३१ जुलै २०२१ होती. GAT-B आणि BET 2021 प्रत्येकी तीन तास कालावधीची आहे. GAT-B परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत आणि BET 2021 परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित केली जाणार आहे. दोन्ही परीक्षा इंग्रजी भाषेत असतील आणि संगणकीय मोडवर होतील. अॅडमिट कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी किंवा तारखेच्या बाबतीत उमेदवार एनटीए हेल्पलाइन नंबर: ०११-४०७५ ९००० वर कॉल करू शकता किंवा एनटीएशी dbt@nta.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lMgvkE
via IFTTT

Post a Comment

0 Comments