Also visit www.atgnews.com
HSC Result 2021: सर्वच विभागीय मंडळे शंभरीच्या उंबरठ्यावर, पाहा संपूर्ण आकडेवारी
Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा विभागीय निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. विभागनिहाय निकाल पाहायला गेलं तर यंदा सर्वच विभाग शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. राज्य मंडळाअंतर्गत येणाऱ्या नऊच्या नऊ विभागांचा निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर सर्वच विभागीय मंडळ यावर्षी अव्वल आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एकूण ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान यंदा शाखानिहाय निकालाची टक्केवारी देखील चांगली आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे. बातमीखाली निकालाची थेट लिंक देण्यात आली आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल ९९.८१ टक्के लागला. त्यामुळे नंबरच काढायचा असेल तर कोकण विभाग पहिल्या नंबरावर म्हणावा लागेल. पण यंदा सर्वच विभाग एकमेकांच्या खूपच जवळ आहेत. मुंबई विभागाचा निकाल ९९.७९ टक्के इतका लागला तर पुणे विभागाचा निकाल ९९.७५ टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६७ टक्के लागला तर नाशिक विभागाचा निकाल ९९.६१ टक्के इतका आहे. लातूर विभागाचा निकाल ९९.६५ टक्के लागला तर नागपूरचा निकाल ९९.६२ टक्के लागला आहे. अमरावतीचा निकाल ९९. ३७ टक्के लागला तर औरंगाबाद विभागाचा निकाल ९९.३४ टक्के लागला आहे. अशा अटीतटीच्या निकालामुळे सर्वच विभागीय मंडळांनी आपली पाठ थोपाटून घेतली आहे. मुला-मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून यामध्ये ६ लाख ९ हजार ३५ मुली तर ७ लाख १० ७१९ मुलींचा समावेश आहे. तर उत्तीर्ण झालेल्या एकूण मुलांची संख्या एकूण १३ लाख १४ हजार ९६५ इतकी आहे. यामध्ये ७ लाख ७ हजार ५१८ विद्यार्थी तर ६ लाख ७ हजार ४४८ विद्यार्थीनींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९९.६३ टक्के इतके आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९९.५४ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९९.७३ टक्के इतके आहे. असा तयार झाला बारावीचा निकाल बारावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावी, अकरावी आणि बारावी अशा तीन वर्गांचे गुण विचारात घेण्यात आले आले. दहावी आणि अकरावीच्या लेखी परीक्षांचे प्रत्येकी ३० टक्के, तर बारावीचे ४० टक्के गुण गृहित धरण्यात आले आहेत. याशिवाय, बारावीचे अंतिम तोंडी परीक्षेचे गुणही विचारात घेतले गेले आहेत. अशी होती प्रक्रियाबारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर, याकरिता एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली. या कालावधीत बहुतांश नियमित विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर अपलोड झाले होते. सुरुवातीला आलेल्या काही अडचणींनंतर बहुतांश ज्युनियर कॉलेजेसनी विद्यार्थ्यांचे गुण महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे सादर केले. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भातील काही अडचणी वगळल्यास बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २ ऑगस्टला संध्याकाळी निकालाची घोषणा करण्यात आली. कुठे पाहाल निकाल? बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा. यानंतर Maharashtra या लिंकवर क्लिक करा. यानंतर बारावीचा रोल नंबर टाकून सबमिट करा. यानंतर तुम्हाला बारावीचा निकाल २०२१ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rUCHKv
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments