दहावीपासून बोर्डाने घेतला धडा; बारावीचा ऑनलाइन निकाल सुरळीत

राज्य मंडळाचा बारावीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी ४ वाजल्यापासून वैयक्तिक निकाल पाहता येत आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन निकालाची एकही वेबसाइट हँग झालेली नाही. विद्यार्थी सुरळीतपणे निकाल पाहू शकत आहेत. निकालासाठी एकाहून अधिक संकेतस्थळांचे पर्याय दिल्याने दहावीच्या वेळी झालेला घोळ मंडळाला टाळता आला आहे. पुढील थेट लिंकद्वारे पाहता येईल बारावीचा निकाल - दहावीचा यंदाचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना हा निकाल पाहण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने अवघी एक लिंक उपलब्ध केली होती. परिणामी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी ही लिंक अॅक्सेस करण्याचा प्रयत्न केल्याने वेबसाइट अवघ्या काही मिनिटातच कोलमडली होती. रात्री उशिरापर्यंत आपला निकाल पाहता न आल्याने लाखो विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली होती. राज्य मंडळामार्फत इयत्ता दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भातली चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. निकालाच्या वेबसाइटबाबत कोणत्या त्रुटी राहिल्या, त्याची ही समिती चौकशी करत आहे. मात्र हा अनुभव लक्षात घेऊन पोळलेल्या शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाबाबत कोणतीही रिस्क घेतली नाही. बारावीच्या निकालासाठी अनेक संकेतस्थळांचे पर्याय विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांना निकाल सुरळीतपणे पाहता आला. बारावीचा निकाल ९९.६३ टक्के बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एकूण ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दृष्टीक्षेपात निकाल - परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १३,१९७५४ एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १३,१४,९६५ एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९९.५४ एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी - ९९.७३ एकूण निकाल - ९९.६३ टक्के


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jmmvxV
via IFTTT

Post a Comment

0 Comments