Also visit www.atgnews.com
NTPC मध्ये विविध पदांची भरती; ७१ हजारपर्यंत पगार, परीक्षा न देताच होणार निवड
NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी () NTPC ने एक्झिक्युटिव्ह आणि सिनिअर एक्झिक्युटिव्ह पदांची भरती (NTPC Recruitment 2021) केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. ६ ऑगस्ट ही अर्ज (NTPC Recruitment 2021) करण्याची शेवटची तारीख आहे. याशिवाय बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन देखील थेट अर्ज करता येऊ शकतो. या भरतीअंतर्गत एकूण २१ पदं भरली जाणार आहेत. त्यानुसार एक्झिक्युटिव्हची १९ पदं आणि सिनिअर एक्झिक्युटिव्हची २ पदं भरली जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह (कमर्शिअल) - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंगमध्ये डिग्री आणि मॅनेजमेंट/एमबीए किंवा त्या समकक्ष पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणे गरजेचे आहे. O&M- B.E./B.Tech एक्झिक्युटिव्ह (सल्ला)- यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह मॅकेनिक किंवा पॉवर इंजिनीअरिंगमध्ये डिग्री असणे गरजेचे आहे. B.E./B.Tech इंजिनीअरिंगसाठी एक्झिक्युटिव्ह (सल्ला) - यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये किमान ६० टक्के गुणांसह ग्रॅज्यएट पदवी असणे गरजेचे आहे. प्रोजेक्ट देखरेखीसाठी एक्झिक्युटिव्ह (सल्ला)- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्धेकून बीई किंवा बीटेकमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण असणे गरजेचे आहे. एक्झिक्युटिव्ह (बिझनेस अॅनालिस्ट)- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह बिझनेस अॅनालिस्ट आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स असणे गरजेचे आहे. सिनिअर एक्झिक्युटिव्ह (सौर)- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयात इंजिनीअरिंगची डिग्री असणे गरजेचे आहे. सिनिअर एक्झिक्युटिव्ह (कंपनी सचिव)- ICSI चे सदस्य असणे गरजेचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिकेश, अॅडव्हराटाइजिंग इन कम्युनिकेशन, पब्लिक रिलेशन, मास कम्युनिकेशन, जर्नलिझ्म यापैकी एक असणे गरजेचे आहे. एक्झिक्युटिव्ह (क्लीन टेक्नोलॉजी)- एनर्जी डोमेनमध्ये एम.टेक/पीएचडी सोबतच किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयात इंजिनीअरिंग/ टेक्नोलॉजी डिग्रीला प्राधान्य दिले जाईल. Recruitment 2021 साठी वयोमर्यादा एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३५ वर्षे, सिनिअर एक्झिक्युटिव्हसाठी ५६ वर्षे आणि एक्झिक्युटिव्ह (क्लीन टेक्नोलॉजी) साठी ५६ वर्षांची वयोमर्यादा आहे. उमेदारांची निवड ही थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fRsav5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments