RBI JE Result declared: रिझर्व बॅंक ज्युनिअर इंजिनीअर भरती परीक्षेचा निकाल जाहीर

RBI Junior Engineer : भारतीय रिझर्व बॅंक (RBI) ने ज्युनिअर इंजिनीअर भरती २०२१ साठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जेई रिक्रूटमेंट रिझल्ट २०२१ (RBI JE 2021 Result)जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस बसलेले उमेदवार दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आपला रिझल्ट पाहू शकतात. आरबीआयने ज्युनिअर इंजिनीअर (RBI JE Vacancy)पदांच्या भरतीसाठी ८ मार्च २०२१ ला ऑनलाइन परीक्षेचे आयोजन केले होते. देशातील विविध शहरांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले उमेदवार आपला रजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने रिझल्ट तपासू शकतात. 2021: असा पाहा आरबीआय जेई रिझल्ट आरबीआयची अधिकत वेबसाइट rbi.org.in वर जा. होमपेजवर Sections Updated Today टॅबवर क्लिक करा. खाली एक बॉक्स उघडेल. यामध्ये Opportunities Results लिंकवर क्लिक करा. आरबीआय रिक्रूटमेंट रिझल्टचे पेज उघडेल. इथे जेई (सिविल/इलेक्ट्रिकल) पॅनल इयर २०१९ रिझल्ट लिंकवर क्लिक करा. आणखी एक पेज खुले होईल. इथे RBI JE Exam Marksheet च्या खाली Click here लिंकवर क्लिक करा. रिझल्ट तपासण्यासाठी पेज खुले होईल. इथे आपला नोंदणी क्रमांक, पासवर्ड आणि स्क्रिनवर दिसणारा कॅप्चा भरुन लॉगिन करा आता तुम्हाला रिझल्ट आणि मार्कशिट स्क्रीनवर दिसेल. ही डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xx1ghQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments