SBI Jobs: ८५०० एसबीआय अप्रेंटिस भरती २०२० च्या फीस रिफंडसाठी 'या' लिंकवर क्लिक करा

Notice: भारतीय स्टेट बॅंकेतर्फे(State Bank of India)अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते. तसेच ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता आणि फीस भरली होती ते आपली फीस परत घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. एसबीआयतर्फे ही फीस परत दिली जात आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अर्जदारांना त्यांची फीस परत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार, अप्रेंटिस अधिनियम १९६१ अंतर्गत जाहीरात क्रमांक सीआरपीडी/एपीपीआर/२०२०-२१/०७ दिनांक २० नोव्हेंबर २०२० ला अप्रेंटीसशिप नियुक्ती प्रक्रिया रद्द करण्यात आली. ज्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करुन फीस भरली होती त्यांना रिफंड केली जाईल. ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज ज्या उमेदवारांच्या बॅंक खात्यात अर्ज शुल्क अद्याप आले नाही अशा उमेदवारांनी फीस रिफंडसाठी एसबीआयची अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन अर्ज करावा. भारतीय स्टेट बॅंक केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभागाने अर्जदारांना बॅंक अकाऊंट नंबरची डिटेल्स देण्यासाठी एक डेटा कॅप्चर लिंक दिली आहे. ही लिंक ३१ ऑगस्ट २०२१ ला रात्री ११.५९.५९ पर्यंत सुरु राहणार आहे. या अर्जदारांना परत मिळाली फीस ज्या उमेदवारांनी आपल्या बॅंकेतून थेट फीस जमा केली होती त्यांना बॅंकेकडून फीस परत मिळाली आहे. या सर्व उमेदवारांना एक ईमेल आणि एसएमएस त्यांच्या अधिकृत ईमेल आणि मेसेजवर पाठविण्यात आले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3js8LBM
via IFTTT

Post a Comment

0 Comments