UPSC पदभरती अंतर्गत १५१ रिक्त जागा भरणार, जाणून घ्या सविस्तर

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) कर्मचारी राज्य विमा महामंडळ () मध्ये उपसंचालक ( ) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण १५१ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर upsconline.nic.in वर ऑनलाइन माध्यमातून यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२१ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर अर्ज भरावा. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास तो बाद करण्यात येईल. उमेदवारांना ३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट करता येऊ शकेल. भरतीचा तपशील यूआर उमेदवारासाठी- ६६ पदे एससी उमेदवारासाठी-२३ पदे एसटी उमेदवारासाठी-९ पदे ओबीसी उमेदवारासाठी-३८ पदे EWS उमेदवारासाठी-१५ पदे पीडब्ल्यूडी उमेदवारासाठी-४ पदे शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला शासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील प्रशासन/ अकाऊंट/ मार्केटिंग/ जनसंपर्क/ विमा/ महसूल/ टॅक्स यापैकी एकाचा तीन वर्षांचा अनुभव असावा. अर्ज शुल्क उमेदवारांना केवळ २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SBI च्या कोणत्याही शाखेत पैसे देऊन किंवा SBI ची नेट बँकिंग सुविधा वापरून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून उमेदवारांना अर्ज शुल्क भरता येऊ शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37I74uy
via IFTTT

Post a Comment

0 Comments