Also visit www.atgnews.com
CUCET २०२१ च्या नोंदणीची तारीख वाढवली, जाणून घ्या तपशील
CUCET 2021: सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्ट (Central Universities Common Entrance Test, CUCET 2021)च्या नोंदणीची तारीख वाढवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवार आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. याआधी २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार होता. कॉम्प्युटर आधारित कॉमन एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन १५,१६,२३ आणि सप्टेंबरला देशभरात होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने आयोजित केलेल्या या परीक्षेद्वारे इंटिग्रेटेड, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. अर्ज करण्याची अखेरची मुदत २ सप्टेंबर २०२१ आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी cucet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. देशातील १२ केंद्रीय विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी CUCET 2021 ही प्रवेश परीक्षा होते. CUCET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. CUCET २०२१ परीक्षा - १५, १६, २३ आणि २४ सप्टेंबर २०२१ अर्ज शुल्क भरण्याची मुदत - २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५० वाजेपर्यंत CUCET 2021 साठी अर्ज कसा करायचा? - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ cucet.nta.nic.in वर जा. - ' for CUCET 2021' लिंकवर क्लिक करा. - आता नवं पेज उघडेल. - येथे नोंदणी करा आणि साइन इन करा. - आता अर्ज भरा. - आवश्यक कागदपत्रे/त अपलोड करा - ऑनलाइन शुल्क भरा - अर्ज भरल्यानंतर एक कॉपी भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा. CUCET २०२१ पेपर पॅटर्न CUCET २०२१ परीक्षा ऑनलाइन LAN बेस्ड CBT पद्धतीने होते. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न येतात. १२० मिनिटांचा अवधी असतो. MCQ प्रकारच्या या प्रश्नांची भाषा इंग्रजी असते. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विस्तृतपणे पेपर पॅटर्न समजून घ्यावा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yz8t1i
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments