AICTE चे पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने () व्यवस्थापन पदविका आणि प्रमाणपत्र (PGDM-PGCM) अभ्यासक्रमांचे सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार नव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 'इंडक्शन प्रोग्राम' १५ नोव्हेंबरला होईल, असे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षापासून देशात करोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळित झाले आहे. विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा उशिरा झाल्याने, निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ''ला शैक्षणिक वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. त्यानुसार व्यवस्थापन पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक 'एआयसीटीई'कडून नुकतेच वेबसाइटवर जाहीर करण्यात आले. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेशासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्काच्या परताव्यासह प्रवेश रद्द करण्यासाठीची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर असल्याचे परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BsxQ6G
via IFTTT

Post a Comment

0 Comments