Also visit www.atgnews.com
स्टाफ सिलेक्शनतर्फे ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर २०२० परीक्षेचा निकाल जाहीर
SSC Result 2021: कर्मचारी निवड आयोगातर्फे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२० चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यासोबतच आयोगाने अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाचा निकाल ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटरच्या एकूण २८३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी स्टाफ सिलेक्शनतर्फे ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर आणि सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२० चे नोटिफिकेशन २९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले. याची अर्ज प्रक्रिया २५ जुलैपर्यंत सुरु होती. त्यानंतर ६ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. यानंतर दुसऱ्या टप्प्याची परीक्षा ३१ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली. दोन्ही टप्प्यातील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार होते. ६ हजारहून अधिक उमेदवारांना 'दिवाळी गिफ्ट' दिवाळी २०२१ च्या पार्श्वभूमीवर देशभरातील ६ हजारहून अधिक उमेदवारांना स्टाफ सिलेक्शनतर्फे 'दिवाळी गिफ्ट' मिळणार आहेत. कमिशन (SSC) द्वारे या ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन प्रमुख भरती परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दोन्ही भरती परीक्षांद्वारे संबंधित पदांसाठी एकूण ६१२९ अंतिम उत्तीर्णांची घोषणा करुन त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यासोबतच दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीमधील उत्तीर्ण उमेदवारांना दिल्लीतील निवडक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाणार आहे. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती निकाल ३१ ऑक्टोबरला स्टाफ सिलेक्शनद्वारे दिल्ली पोलिसांमध्ये पुरुष आणि महिला कॉन्स्टेबलच्या एकूण ५८४६ पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन १ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या पदभरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ सप्टेंबरपर्यंत सुरु राहिली. या पदांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेअंतर्गत २७ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत कॉम्प्युटर आधारित ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. सीबीटीचा निकाल १५ मार्चला जाहीर झाला. त्यानंतर २८ जून २०२१ पासून फिजिकल फिटनेस टेस्ट आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यानंतर आता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाकडून ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jOXV9X
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments