Also visit www.atgnews.com
मुलांना शाळेत सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू: वर्षा गायकवाड
Schools Reopening Webinar 2021: 'ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होत आहेत. एसओपीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू व्हाव्यात. मुलांना शाळेत पाठवताना पालकांची संमती तर आवश्यक आहेच, शिवाय पालकांचे सहकार्यही आवश्यक आहे. मुलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्व एकत्रित येऊन ही जबाबदारी पार पाडू,' असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केला. येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता वेबिनार आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. गायकवाड म्हणाल्या, 'यापूर्वीही शाळा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. काही ठिकाणी शाळा सुरूही झाल्या होत्या. आताही कोविड टास्क फोर्सशी बोलून आम्ही शाळा सुरू करण्यासंबंधी एसओपी जाहीर केल्या आहेत. शाळांशी संबंधित सर्व घटकांसोबत आम्ही चर्चा करत आहोत.' राज्याच्या टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. समीर दलवाई, शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी, माजी शिक्षण संचालक, शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेत मार्गदर्शन केले. सुमारे दीड वर्षाच्या मोठ्या खंडानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक, पालकांनी मुलांना सुरक्षित आणि आनंदी वातावरणात पुन्हा शाळेशी जुळवून घेण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करायला हवेत, त्याबाबती या वेबनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सुरुवातीचे दोन आठवडे तरी परीक्षा, सिलॅबस नको मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई म्हणाले, 'घरात दीड वर्ष मुलं आई-वडिलांसोबत होती. असं प्रथमच घडलं. त्यामुळे ती आता शाळेत असताना पालकांनी काही नियोजन करणं आवश्यक आहे. अचानक शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना नियोजन, शिस्त, अनुशासन या बाबींकडे लक्ष द्यायला हवं. सुरुवातीला मुलांना किमान एक तास आधीपासून तयार करावं. पहिल्या दोन आठवड्यात तरी किमान परीक्षा, सिलॅबस या गोष्टी पाहू नयेत. मुलांनी या दीड वर्षात कदाचित घरी विविध प्रसंग अनुभवले असतील, मुलांना आधी शाळेत योग्य पद्धतीने व्यक्त होऊ द्यावे.' करोना काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचं आरोग्य जपत कशा पद्धतीने शाळेच्या इमारती आदींची रचना असावी, मुलांचा आहार पोषक असावा याबाबत पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. 'मुलांना शाळेत येण्यासाठी त्यांच्या लसीकरणाची आवश्यकता नाही,' असं हेमांगी जोशी म्हणाल्या. मुलांच्या वर्तणुकीच्या दृष्टीने सुरुवातीला काही बदल जाणवू शकतील, कारण त्यांना, विशेषत: शहरी भागातील मुलांना ऑनलाइन स्क्रीनची सवय लागलेली, ती मागे पडताना त्याचे पडसाद त्यांच्या वर्तनात उमटू शकतात. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षकांना कल्पकतेने आणि संयमाने मुलांसोबत वागण्याची गरज आहे, असे हेमांगी जोशी यांनी सांगितले. शिक्षकांचं मोफत समुपदेशन करता येईल का हेही शासनाने पाहायला हवं, असं आवाहन त्यांनी केले. मुलांना सुरुवातीला व्यक्त होऊ द्या, एकमेकांशी बोलू द्या असं आवाहन शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी शिक्षकांना केलं, तर शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या हातातून लगेच मोबाइल न हिसकावून घेता, मोबाइलचा चांगला वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्या, असं काळपांडे यांनी पालकांना सांगितलं. प्रसारमाध्यमांनी शाळा सुरू झाल्यानंतर सकारात्मक बातम्यांवर भर द्यावा, अशी अपेक्षा हेमांगी जोशी, काळपांडे यांनी व्यक्त केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WvxI7P
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments