Also visit www.atgnews.com
CIPET मध्ये विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड
CIPET 2021: पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत (Central Institute of Petrochemicals Engineering & Technology)विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. सिपेट अंतर्गत फॅकल्टी, प्लेसमेंट असिस्टंट, ऑफीस असिस्टंट, मेंटेनन्स असिस्टंट, टेक्निशियन आणि मशीन ऑपरेटर पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. फॅकल्टी (मेकॅनिकल इंजिनीअर) पदाची १ जागा भरण्यात येणार असून यासाठी बीई/एमई (मेकॅनिकल) मध्ये किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. फॅकल्टी (पॉलिमेकर) प्लास्टिक इंजिनीअरच्या ३ जागा रिक्त असून बीटेक/एमटेकमध्ये किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. प्लेसमेंट असिस्टंट पदाची एक जागा आणि ऑफीस असिस्टंट पदाच्या ५ जागा रिक्त असून आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये ५० टक्के गुणांसह पदवी, एमएचसीआयटी, इंग्रजी आणि मराठी टायपिंग येणे गरजेचे आहे. मेंटेनंन्स असिस्टंट पदाची १ जागा रिक्त असून इलेक्ट्रीकलमध्ये डिप्लोमा आणि एमएचसीआयटी पास असणे गरजेचे आहे. टेक्निकल पदाची एक जागा रिक्त असून पीजी डिप्लोमा, बीएससी/एमएससी (केमिस्ट्री), बायोकेमिस्ट्री, एमएचसीआयटी असणे गरजेचे आहे. मशिन ऑपरेटर (प्रोसेसिंग) च्या ३ जागा रिक्त असून इंजेक्शन अॅण्ड ब्लो मशिन ऑपरेटरचा शॉर्ट टर्म कोर्स असणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखातीकरिता उपस्थित राहावे. यासाठी सीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -३/२, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद- ४३१००६ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y8swYx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments