Also visit www.atgnews.com
महाराष्ट्र कारागृह विभागात भरती, २० हजारपर्यंत मिळेल पगार
: पुणे (महा कारागृह विभाग) येथे पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील जाहीरातीमध्ये देण्यात आला आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विधी अधिकारी गट ब पदाची जागा भरली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने हे पद भरले जाणार आहे. या पदाचा कालावधी ११ महिन्यांसाठी असेल. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2YejxEY वर दिलेल्या नमुन्यानुसार भरायचा आहे. अर्जावर 'विधी अधिकारी या पदासाठी अर्ज' असा स्पष्ट उल्लेख करायचा आहे.पत्रव्यवहाराकरिता उमेदवाराचा पत्ता लिहिलेले दोन लिफाफे सोबत जोडावे. उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी नमूद करावा. उमेदवारांनी आपला अर्ज अपर पोलीस महा संचालक व कारागृह महानिरीक्षणालय , महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. १५ ऑक्टोबर संध्याकाळी ५.४५ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत भरती राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहयोगी (Project Associate) आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी ( Senior Project Associate) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YbeOUO
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments