नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीमध्ये भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

NADA Recruitment 2021: भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या () आणि राष्ट्रीय युवा कार्यक्रम (National Youth Program) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. NADA ही एक स्वायत्त संस्था असून देशभरातील खेळांमध्ये डोपिंगविरोधी कार्यक्रमांचा प्रोत्साहन देणे, निरीक्षण आणि समन्वय राखण्याचे काम करते. या पदभरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीतर्फे होणाऱ्या पदभरती अंतर्गत प्रोग्राम असोसिएट (Program Associate), प्रोग्राम असोसिएट (लीगल) (Program Associate-Legal), प्रोग्राम असोसिएट (शिक्षण) (Program Associate-Teaching), रिसर्च असोसिएट (Research Associate), प्रशंसनिक असोसिएट (Appreciative Associate), टेक्निकल असोसिएट-कोऑर्डिनेशन) (Technical Associate-Coordination), टेक्निकल असोसिएट-डोप टेस्टिंग Technical Associate (Dope Testing)ही पदे भरली जाणार आहेत. प्रोग्राम असोसिएट पदाच्या एकूण जागा ३ जागा भरण्यात येणार असून यासाठी उमेदवाराने एम फार्मा/एमएससी फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. प्रोग्राम असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ६० हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल. प्रोग्राम असोसिएट (लीगल) च्या २ जागा रिक्त असून यासाठी उमेदवाराकडे एलएलबीची डिग्री आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. प्रोग्राम असोसिएट (लीगल) म्हणून निवड झालेल्या उमेदवारास ६० हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. प्रोग्राम असोसिएट (शिक्षण) ची १ जागा रिक्त असून यासाठी उमेदवाराकडे स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये मास्टर्सची डिग्री असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराला ६० हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. रिसर्च असोसिएटच्या ५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी एमफार्मा/एमएससी फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ४० हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. अप्रेशिएटीव्ह असोशिएटची एक जागा रिक्त असून यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून फर्स्ट डिव्हिजन पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराला ४० हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. टेक्निकल असोसिएट (कोऑर्डिनेशन) पदाच्या ३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे फर्स्ट डिव्हिजन बी फार्मा पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास २५ हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. टेक्निकल असोसिएट (डोप टेस्टिंग) च्या ३ जागा भरण्यात येणार असून उमेदवाराकडे फर्स्ट डिव्हिजन डीएमएलटी मध्ये शिक्षण असणं आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी, हॉल क्रमांक १०४. पहिला मजला. जेएलएन स्टेडियम, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठवायचा आहे. ३१ ऑक्टोबर ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BsajU2
via IFTTT

Post a Comment

0 Comments