Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; नॅककडून सात वर्षांसाठी मुदतवाढ
मुंबई विद्यापीठाच्या () शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (NAAC) कडून मुंबई विद्यापीठाला पाच वर्षा ऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. मूल्यांकनानंतर सर्वसाधारणपणे ही मुदत पाच वर्षांची असते. नुकतेच मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीसह ३.६५ एवढे सर्वाधिक गुणांकन मिळाले आहे. पूर्वीच्या सर्वोच्च गुणवत्तेच्या निकषानुसार मुंबई विद्यापीठास ही सात वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी विद्यापीठास २००१ ला “फाईव्ह स्टार” (सर्वाधिक श्रेणी) त्यानंतर २०१२ ला “अ” ( सर्वाधिक श्रेणी) प्राप्त झाली होती. याच निकषांवर तिसऱ्यांदा सर्वाधिक गुणांकनासह अ++ श्रेणी प्राप्त झाल्याने पाच वर्षा ऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. यानुसार आता मुंबई विद्यापीठाकडे २०२८ पर्यंत नॅकचा दर्जा असणार आहे. नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. नॅक पीअर टीमने २४ ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान मुंबई विद्यापीठास मूल्यांकनासाठी भेट दिली होती. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधनवृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. 'मुंबई विद्यापीठाने मैलाचा दगड ठरेल अशी अत्यूच्च कामगिरी केली आहे. पाच वर्षा ऐवजी सात वर्षांच्या मुदतवाढीमुळे आता विद्यापीठ ग्रेड वन ऑटोनॉमी तसेच युनिव्हर्सिटी विथ एक्सलेंसला पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम श्रेणीतील ‘संशोधन विद्यापीठ’ म्हणूनही विद्यापीठाचे स्थान अधोरेखित होणार आहे.' – प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र- कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DwV5O6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments