यूपीएससी वन सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

Prelims : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२१ आणि भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर केले आहेत. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निकाल जाहीर करण्यात आले. आयोगाने पुढील टप्प्यात म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) आणि IFS (पूर्व) च्या आधारे मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर जाहीर केले. यूपीएससी आयएएस पूर्व २०२१ परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाने जाहीर केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचा रोल नंबर तपासू शकतात. यूपीएससीने १० ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये प्राथमिक परीक्षेचे आयोजन केले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा आणि आयएफएस प्राथमिक परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे पुढील टप्प्यासाठी यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्यासाठी अर्ज (DAF) भरावा लागेल. आयोगाने DAF भरण्याच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी यूपीएससीने उमेदवारांना डिएएफसाठी अधिकृत वेबसाइटला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन केले आहे. अंतिम निकालानंतर पूर्व परीक्षेचे गुण आणि कट ऑफ जाहीर यूपीएससीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, पूर्व परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांचे गुण, 'अंतिम उत्तरतालिका' नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या अंतिम निकालाच्या घोषणेनंतरच जाहीर केली जाईल. यासंदर्भातील सर्व तपशील अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातील असे आयोगाने म्हटले आहे. यूपीएससीतर्फे हेल्पलाइन आयोगाने घोषित केलेल्या निकालांबद्दल कोणतीही माहिती किंवा कोणतेही स्पष्टीकरण हवे असणाऱ्या उमेदवारांसाठी यूपीएससीने हेल्पलाइन जाहीर केली आहे. सर्व उमेदवार आयोगाचा दूरध्वनी क्रमांकांवर ०११-२३३८५२७१, ०११-२३०९८५४३ किंवा ०११-२३३८११२५ वर सर्व कामकाजाच्या दिवसांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत कॉल करून मदत मिळवू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XX8D6r
via IFTTT

Post a Comment

0 Comments