Also visit www.atgnews.com
MAH MBA CET 2021: एमबीए सीईटीचा निकाल जाहीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकाल प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केला आहे. या निकालामुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. या परीक्षेला राज्यभरातून एक लाख ३२ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची सीईटी १६ ते १८ सप्टेंबर काळात घेण्यात आली होती. सुमारे २०० केंद्रावर दरारोज दोन सत्रात परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली. एक लाख १० हजार १९० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेतील त्रुटी समोर आणत ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आणि हे विद्यार्थी न्यायालयात गेल्यामुळे निकाल जाहीर करता आला नाही. मात्र, प्रवेश प्रक्रियेवर होणारा उशीर लक्षात घेऊन यापूर्वीच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणेच त्या विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवत सीईटी सेलने शुक्रवारी निकाल जाहीर केला आहे. अंतिम सुनावणीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांमध्ये सुमारे ३५ हजार जागा आहेत. या जागांवर प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगीन मधून www.mahacet.org आणि https://ift.tt/3vMLhvb या संकेतस्थळांवर निकाल देण्यात आला आहे. विधी तीन वर्षे सीईटीचाही निकाल जाहीर उच्च शिक्षण विभागाच्या विधी तीन वर्षे या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी ४ सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेस ५६,५८७ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CvBvBZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments