शिक्षकांना आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा; युनेस्कोच्या अहवालातील सूचना

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिक्षकांना आघाडीवरील कर्मचारी () म्हणून मान्यता देण्यात यावी. तसेच, शिक्षकांना अधिक तंत्रसक्षम करावे अशा महत्त्वपूर्ण सूचना युनेस्कोच्या () '' (state of the education report 2021, SOER)या अहवालात करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने , टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि शिक्षक शिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने या अहवालावर मंगळवारी चर्चा करण्यात आली. युनेस्को आणि अन्य संस्थांनी केलेल्या पाहणीत विविध बाबी समोर आल्या असून त्याचा अहवाल नुकताच करण्यात आला. या अहवालात शिक्षक, अध्यापन आणि शिक्षकांचे शिक्षण या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षकांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही शाळांमधील शिक्षकांच्या रोजगारात बदल करण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. शिक्षकांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा शिवाय शिक्षकांना अधिक तंत्रज्ञान सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची गरज या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या शिफारशींवर मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सूचना करण्यात आल्या. शिक्षकांच्या व्यावसायिक अस्मितेचा विकास ही काळाची गरज आहे हे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. व्यावसायिक विकासाची रचना तयार करून शिक्षकांची ओळख वाढविणे आणि त्यांना अधिक स्वायत्तता देणे हे महत्त्वाचे ठरणारे आहे, असे मत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक रूची कुमार यांनी व्यक्त केले. असे झाले तर शैक्षणिक आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर येणे शक्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांना करोनाकाळात वैविध्यपूर्ण भूमिका साकाराव्या लागल्या. अनेक शिक्षकांना पुन्हा विद्यार्थी होऊन तंत्रकौशल्य अवगत करावी लागली यातच करोनाकाळात माहिती गोळा करण्यापासून अनेक कामे शिक्षकांनी केली यामुळे पुन्हा एकदा शिक्षक त्याला नेमून दिलेल्या कामांव्यतिरिक्तची कामे करताना दिसल्याचे निरीक्षण केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक अनुषा रामनाथन यांनी नोंदवले. शिक्षकांना एकविसाव्या शतकातील भविष्याचा वेध घेऊन अधिक चांगले प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत ग्लोबल टीचर अॅवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BgeAtR
via IFTTT

Post a Comment

0 Comments