शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

Shivaji University Recruitment: कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. ही भरती विशिष्ट कालावधीसाठी असणार आहे. कोल्हापूर भरती २०२१ अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे. या पदाच्या एकूण ४० जागा रिक्त आहेत. मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे. केमिस्ट्री डिपार्टमेंट अंतर्गत ६, झूलॉजी अंतर्गत २, फिजिक्स डिपार्टमेंट ३ जागा तर स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथेमॅटीक्स, , बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. डिपार्टमेंट ऑफ सोशओलॉजी अंतर्गत ४, डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लॅंग्वेज, कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट अंतर्गत १ आणि डिपार्टमेंट ऑफ पॉलिटीकल सायन्स, हिस्टरी,हिंदी अंतर्गत प्रत्येकी २ जागा रिक्त आहेत. या पदासाठी १८ ऑक्टोबरला मुलाखती होणार आहेत. तबला, हार्मोनियम आणि नाट्यशास्त्रात, तंत्रज्ञ (म्युझिक आणि ड्रामा) या विभागात सहय्यक प्राध्यापक पदाच्या २ जागा कंठ संगीत, पीएलसी, कथ्थक, भरतनाट्य विभागात प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. तसेच कथक संगीत, पीएलसी, कथ्थक, भरतनाट्य याची प्रत्येकी एक जागा भरायची आहे. तर कथ्थक, हार्मोनियम, नाट्यशास्त्र आणि तंत्रज्ञ (म्युझिक आणि ड्रामा) पदाच्या प्रत्येकी २ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ११ ऑक्टोबर रोजी मुलाखत होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विद्यापीठ कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ४१६००४ या पत्त्यावर दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे. ११, १६ आणि १८ ऑक्टोबर रोजी मुलाखत होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. विविध पदांची भरती शिवाजी विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या पदभरतीमध्ये प्रोफेसर ऑफ बॅंक ऑफ इंडिया चेअर आणि प्रोफेसर ऑफ भगवान महावीर चेअर या पदांवरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या दोन्ही पदांसाठी ६५ वर्षे इतकी वयोमर्यादा देण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. तर अर्जाची प्रत १६ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाच्या कार्यालयात पाठवायची आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळेल. त्याची प्रिंट काढून अर्ज भरता येईल. सोबत ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत अर्जासोबत जोडली नसेल तर अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट, अटेस्टेड कॉपी आणि महत्वाची कागदपत्रे पाठवायची आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AjRj8O
via IFTTT

Post a Comment

0 Comments