IBPS Clerk 2021: राष्ट्रीय बॅंकेमध्ये ५८५८ पदांची भरती, पुन्हा उघडली अर्जाची विंडो

IBPS 2021: तुम्ही देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक पदांवर सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँक लिपिक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना IBPS Clerk भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ५८५८ लिपिक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. 1 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)ने ११ जुलै २०२१ ला नोटिफिकेशन (क्र. सीआरपी लिपिक- XI २०२२-२३) जाहीर केले. त्यानुसार १ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. IBPS ने या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु केल्याची घोषणा केली आहे. IBPS क्लर्क भरती २०२१: २७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज IBPS द्वारे ५८५८ लिपिक भरतीसाठी अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. ६ ऑक्टोबरला यासंदर्भात नोटिस जाहीर करण्यात आली. त्यानुसार उमेदवार ७ ऑक्टोबरपासून अर्ज करु शकतात. आयबीपीएस क्लर्क भरती २०२१ अर्जाच्या प्रक्रियेअंतर्गत उमेदवार २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. सोबतच उमेदवारांना २७ ऑक्टोबरपर्यंत निर्धारित परीक्षा शुल्क ८५० रुपये भरावे लागेल. याप्रमाणे अर्ज करा IBPS लिपिक भरती २०२१ अंतर्गत ५८५८ पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या पोर्टलवर उमेदवारांना प्रथम नवीन नोंदणीवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर दिला गेलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. यानंतर उमेदवार त्यांचे IBPS क्लर्क २०२१ साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. IBPS क्लर्क भरती २०२१: पात्रता निकष जाणून घ्या इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२१ रोजी किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वीचा नसावा आणि १ सप्टेंबर २००० नंतरचा असावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uSqYxK
via IFTTT

Post a Comment

0 Comments