JEE Advanced परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'अशी' करा डाऊनलोड

JEE Advanced Answer Key 2021: एन्ट्रन्स एक्झाम अॅडव्हान्स २०२१ परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी पार पडली. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर उत्तरतालिका ( Download) जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिका पाहता येणार आहे. जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. यामध्ये, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० सप्टेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला. २१ सप्टेंबर २०२१ अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख होती. ही परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली. त्याचे प्रवेशपत्र २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. आता उत्तरतालिका (JEE Advanced Answer Key 2021) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल (JEE Advanced 2021 Result) लवकरच जाहीर केला जाईल. JEE Advanced Answer Key 2021: अशी करा डाऊनलोड स्टेप १: सर्वातआधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा. स्टेप २ : वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिकेच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ४: उत्तरतालिका तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: उत्तरतालिका तपासा आणि डाउनलोड करा. स्टेप ६: थेट लिंकवरून उत्तरतालिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा महत्वाच्या तारखा जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेच्या आयोजनानंतर त्याच्या निकालाची घोषणा आयआयटी खडगपूरद्वारे केली जाणार आहे. या अंतर्गत संस्थेद्वारे सर्वात आधी दोन्ही पेपर दिलेल्या उमेदवारांची रिस्पॉन्स शीट ५ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली. उमेदवारा २०२१ रिप्सॉन्स शीटची कॉपी परीक्षा पोर्टल jeeadv.ac.in वर लॉगिन करुन डाऊनलोड करु शकतील. उत्तरतालिकेवरील आक्षेपांची समिक्षा केल्यानंतर आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची अंतिम उत्तरतालिका १५ ऑक्टोबर २०२१ ला जाहीर केली जाणार आहे. यासोबतच संस्थेद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ च्या रिझल्टची घोषणा १५ ऑक्टोबरला केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FsB258
via IFTTT

Post a Comment

0 Comments