NTA AIAPGET 2021 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'असा' नोंदवा आक्षेप

AIAPGET 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट (AIAPGET) २०२१ ची तात्पुरती जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट aiapget.nta.ac.in वर उत्तरतालिका पाहता येणार आहे ही परीक्षा १८ सप्टेंबर रोजी सीबीटी मोडमध्ये घेण्यात आली. उत्तरतालिकेसोबत NTA ने रेकॉर्डेड रिस्पॉन्सशीट आणि प्रश्नपत्रिका देखील जाहीर केली आहे. आक्षेप नोंदविण्यासाठी शुल्क उमेदवाराला उत्तरतालिकेवरआक्षेप नोंदवायचा असेल तर ८ऑक्टोबर (संध्याकाळी ५ वा) पर्यंत नोंदवता येणार आहे. यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. उमेदवार प्रतिप्रश्न १००० रुपये शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतो. आक्षेप शुल्क ८ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत भरता येईल. एक पॅनेल सर्व आक्षेपांवर विचार करेल आणि त्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. AIAPGET Answer Key: अशी करा डाऊनलोड सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aiapget.nta.ac.in वर जा. होमपेजवर 'Answer Key 2021' या लिंकवर क्लिक करा. नवीन पेज खुले होईल आणि स्क्रीनवर उत्तरतालिका दिसेल. उत्तरतालिका डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. शुल्क भरून उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतात. अंतिम मुदतीपूर्वी आक्षेप नोंदवा. उमेदवारांनी दाखल केलेल्या आक्षेपांचा विषय तज्ज्ञांकडून आढावा घेतला जाईल. आक्षेप योग्य असल्याचे आढळले तर आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या आक्षेपाबद्दल वैयक्तिकरित्या माहिती दिली जाणार नाही. उमेदवारांना काही अडचण आल्यास ते aiapge@nta.ac.in वर मेल करू शकतात. उमेदवार कोणत्याही माहितीसाठी ०११-४०७५९००० वर संपर्क साधू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oBk66J
via IFTTT

Post a Comment

0 Comments