Also visit www.atgnews.com
UPSC Prelims 2021: परीक्षेला बसण्यापूर्वी नोटीस वाचा अन्यथा होऊ शकते कारवाई
Prelims 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी ()आवश्यक नियम जाहीर केले आहेत. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना या नियमांचे पालन (UPSC issued guidelines) करणे बंधनकारक आहे. नागरी सेवा प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेतली जाणार आहे. या मॅन्युअलमध्ये परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे नियम देण्यात आले आहेत. उमेदवारांनी परीक्षेदरम्यान काय आणावे? काय नाही? आणि प्रवेशपत्राशी संबंधित नियम देण्यात आले आहेत. उमेदवारांनी परीक्षेला जाण्यापुर्वी खाली दिलेले नियम वाचले पाहिजेत आणि काही समस्या असल्यास लवकरात लवकर आयोगाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. महत्वाचे नियम पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणा ज्या उमेदवारांचे फोटोग्राफ्स प्रवेशपत्रावर दिसत नाही त्यांनी परीक्षा हॉलमध्ये येताना दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवावेत. परीक्षेच्या दोन्ही सत्रांमध्ये हे आवश्यक असेल. सहाय्यक आणणाऱ्यांसाठी नियम ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी सहाय्यक निवडले आहेत त्या सहाय्यकांना ई-प्रवेशपत्र देण्यात आले आहे. उमेदवारांना त्याच सहाय्यकासह परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. याशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ओएमआर शीटमध्ये योग्य माहिती भरा नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२१ मधील ओएमआर शीटवरील प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. विशेषत: त्याचा/तिचा रोल नंबर भरताना काही चूक झाल्यास उमेदवाराला उत्तरपत्रिका दिली जाणार नाही. कॉपी / बनावट साहित्य टाळा: सिव्हिल सर्व्हिसेस प्राथमिक परीक्षा २०२१ मध्ये उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर इतर कोणी व्यक्ती परीक्षा देताना पकडले गेले तर उमेदवाराचे परीक्षेतून निलंबन केले जाईल. गुन्हा सिद्ध झाल्यास कडक कारवाईही केली जाईल. परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचा उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचले पाहिजे. केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oMNx5Y
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments