BECIL Recruitment 2021: BECIL कंपनीत विविध पदांवर भरती

BECIL Recruitment 2021: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड, (Broadcast Engineering Consultants India Limited, BECIL) ने एमटीएस, हाउसकीपिंग, सुपरवाइजर अशा विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. याअंतर्गत ५५ पदे भरली जाणार आहेत. मल्टीटास्किंग स्टाफच्या ३२, हाऊसकिपिंगच्या २० आणि सुपरवायझरच्या पदांवर भरती होणार आहे. जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, त्यांनी बीईसीआयएल (BECIL) ची अधिकृत वेबसाइट च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२१ आहे. अशात उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अर्जांची अंतिम मुदत जवळ आहे, या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जांना सुरूवात - २४ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख - १० डिसेंबर २०२१ शुल्क ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडच्या भरती प्रक्रियेंतंर्गत सुपरवायझर पदांसाठी अर्ज करणारे सामान्य, ओबीसी आणि महिला उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी आणि ईडब्ल्यूएस/पीएच श्रेणीच्या उमेदवारांना ४५० रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि शुल्क भरणा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शुल्कासाठी डिमांड ड्राफ्ट, चेक, मनी ऑर्डर, पोस्टल ऑर्डर, पे ऑर्डर, बँकर्स चेक, पोस्टल स्टॅम्प आदि स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑफिशिअल वेबसाइटवरील नोटिफिकेशन चेक करावे. उमेदवार विविध पदांसाठी आवश्यक पात्रता देखील संकेतस्थळावर पाहू शकतील. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d5umgp
via IFTTT

Post a Comment

0 Comments