भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांची भरती

AAI WR : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये (Airports Authority of India, Regional Headquarters, AAI) अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविले आहेत. AAI प्रादेशिक मुख्यालय अप्रेंटिस अॅक्ट १९६१/ २०१४ अंतर्गत यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या रिक्त पदांतर्गत ग्रॅज्युएट्स अप्रेंटिस, डिप्लोमा आणि आयटीआय प्रशिक्षित शिकाऊ उमेदवारांच्या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट @aai.aero वर जाऊन अर्ज करावा लागेल. AAI WR Recruitment 2021: रिक्त जागांचा तपशील ग्रॅज्युएट अप्रेंटिस – २५ पदे डिप्लोमा अप्रेंटिस - ३८ पदे आयटीआय अप्रेंटिस – २७ पदे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणे आवश्यक आहे. तर डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा. याशिवाय आयटीआय ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. या पदावरील उमेदवारांची निवड घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांची वयोमर्यादेचा तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पगार ग्रॅज्युएट अप्रेंटिस - १५,००० रुपये डिप्लोमा अप्रेंटिस – १२ हजार रुपये आयटीआय ट्रेड अप्रेंटिस – ९००० रुपये


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZOM0S9
via IFTTT

Post a Comment

0 Comments