Also visit www.atgnews.com
शालाबाह्य विद्यार्थ्यांना 'इन्स्टाशाला'चा हात, दहा हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा
पुणे : ऑनलाइन शिक्षण परवडत नसलेल्या आणि शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचा धोका असलेल्या वस्ती विभागातील विद्यार्थ्यांच्या मदतीला ‘’ हा उपक्रम धावून आला आहे. पुणे आणि परिसरातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दहा हजारांहून अधिक विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाद्वारे ते अजूनही प्रवाहात टिकून आहेत. विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘स्फेरल फाउंडेशन’ या समाजसेवी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या लॉकडाउनमध्ये शाळा बंद झाल्या. तेव्हा वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी ‘स्फेरल फाउंडेशन’ने पुढाकार घेऊन वस्ती विभागातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. त्यासाठी ‘इन्स्टाशाला’ नावाचे अॅप तयार करण्यात आले. वस्तीतील विद्यार्थ्यांना दररोज मोबाइल किंवा टॅबसारखी उपकरणे उपलब्ध होत नसल्याने ‘इन्स्टाशाला’ अंतर्गत शिक्षकांच्या तासिकांचे व्हिडिओ तयार करण्यात आले. याशिवाय विविध शैक्षणिक आशय तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांना ही उपकरणे उपलब्ध होताच, त्यांना त्यांच्या वेळांनुसार शिकता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून ‘इन्स्टाशाला’ने करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणावर भर दिला. संस्थेतील ४५ शिक्षक आता चाकण, म्हाळुंगे, खराडी, रामवाडी, हडपसर, मुंढवा आदी परिसरांतील वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन शिकवत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या शिक्षकांनी दहा हजारांहून अधिक मुले जोडली आहेत. गणित, विज्ञान, भाषा अशा विषयांचे प्रत्यक्ष शिक्षण देऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेण्याचे काम संस्थेमार्फत होत आहे. याद्वारे शालाबाह्य होऊ घातलेल्या मुलांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली आहे. ‘सेतू’सारखे उपक्रम महत्त्वाचे दीड वर्षे शाळा बंद असल्याने वस्ती विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होणे कठीण असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले. त्यावर तोडगा काढण्यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांची उजळणी करून घेण्यासाठी विशेष उपक्रम राबवला. त्याअंतर्गत ‘सेतू’ अभ्यासक्रमावर आधारित छोटे उपक्रम वस्तीभागात राबवले जात आहेत. गेल्या दीड वर्षांच्या शिक्षणाची उजळणी करून घेणे हा यामागील हेतू असून विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात घेता, असे उपक्रम गरजेचे असल्याचे निरीक्षण संस्थेतील अभ्यासकांनी नोंदवले आहे. लॉकडाउनमध्ये वस्ती विभागात शिकणाऱ्या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पुणे आणि परिसरातील दहा हजार मुले आमच्या संस्थेशी आणि शिक्षकांशी जोडली आहेत. दीड वर्षांत करोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी विविध आशयाची निर्मिती केली आहे. - गीता बोरा, संचालिका, ‘स्फेरल फाउंडेशन’ महापालिकेचीही मान्यता ‘इन्स्टाशाला’ या उपक्रमाची दखल पुणे महापालिकेनेही घेतली आहे. महापालिकेने त्यांच्या वस्ती विभागातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यास मान्यता दिली असून, पालिकेच्या सहकार्याने या शाळांमधील मुले ‘इन्स्टाशाला’शी जोडली गेली आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणपद्धतीद्वारे या विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EPQJ5h
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments