Also visit www.atgnews.com
भारतातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारली: सर्वेक्षण
वृत्तसंस्था, नवी दिल्ली मागील काही वर्षांपेक्षा देशातील , दर्जा सुधारला असल्याचे मत ७३ टक्के भारतीय तरुणांनी व्यक्त केले. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये त्यांनी देशातील शैक्षणिक क्षेत्रातील हा बदल नोंदवला. 'युनिसेफ' आणि 'गॅलप' यांच्या वतीने 'द चेंजिंग चाइल्डहूड प्रोजेक्ट' हे २१ देशांत सर्वेक्षण करण्यात आले. २० नोव्हेंबरला जागतिक बालदिनानिमित्त याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या सर्वेक्षणात १५ ते २५ वयोगटातील ५७ टक्के आणि ४० वर्षांवरील वयोगटातील ४५ टक्के नागरिक सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्र हे भारताच्या प्रगतीचे मोठे निर्देशक आहे, असे मत यात मांडण्यात आले. याबाबत पुरुष आणि महिलांमध्ये मतभिन्नता आहे. मागच्या पिढीपेक्षा नव्या पिढीसाठी शिक्षण अधिक उत्तम पद्धतीने मिळत असल्याचे मत ४० वर्षांवरील ७८ टक्के महिलांनी मांडले, तर ७२ टक्के पुरुषांचे हेच मत आहे. आपल्या यशात शिक्षणाचा वाटा मोठा आहे, असे १५ ते २४ वयोगटातील ५९ टक्के मुलींना वाटते, तर नवे तंत्रज्ञान शिक्षणासाठी पूरक ठरत असल्याचे ६७ टक्के मुलींना वाटते. हेच मत ५९ टक्के मुलांनीही मांडल्याचे अहवालात नमूद आहे. ५७ टक्के भारतीय तरुण दररोज इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळले. ४० वर्षांवरील नागरिकांमध्ये हे प्रमाण २७ टक्के आहे. पालकांपेक्षा मुले ही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असतील, असे ७१ टक्के भारतीय नागरिकांना वाटते, तर ६६ टक्के मुलांनी हेच मत मांडले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cs7TEx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments