Also visit www.atgnews.com
शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी लागणार महास्टुडंट अॅपवर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी आता 'महास्टुडंट ॲप'वर डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. या ॲपचा वापर सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे वर्गात हजेरी नोंदविण्यासाठी वापरण्यात येणारे हजेरीपत्रक कालबाह्य होणार आहे. साधारण दिवाळीनंतर अॅपचा वापर शाळांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून शाळांना सूचना द्याव्या लागणार आहेत. ‘महास्टुडंट ॲप’च्या वापराला मान्यता देण्यात आल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात ‘सरल प्रणाली’वर सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. केंद्र सरकारने विकसित केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये (पीजीआय) शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी गुण आहेत. त्यामुळे राज्याने विकसित केलेल्या ‘सरल प्रणाली’त शाळांच्या विद्यार्थी, शिक्षकांच्या माहितीच्या आधारे राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महास्टुडंट हे ॲप विकसित केले. हे ॲप प्ले-स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिले आहे. ॲपमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून दिली आहे. शिक्षकांची उपस्थितीही या ॲपवर नोंदवता येईल. या ॲपमुळे राज्य, जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती एका क्लिकद्वारे समजणार आहे. शिक्षकांना आता विद्यार्थ्यांचे स्वतंत्र हजेरीपत्र ठेवण्याची गरज नाही, असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. ‘दोन ॲपचे एकत्रीकरण होईल’ ‘महास्टुडंट ॲप’च्या वापरामुळे मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची गरज नाही. या दोन्ही ॲपचे एकत्रीकरण करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या अॅपद्वारे शिक्षकांना वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी ‘क्लिक’वर नोंदवता येणार आहे, असेही निर्णयात सांगितले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wgqgem
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments