Also visit www.atgnews.com
सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Admission Process: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता राज्य सीईटी कक्षाकडून तंत्रशिक्षण विभागांतर्गत बीई, बीटेक, बीएचएमसीटी, आणि डिएसई (Direct Second Year Engineering) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच डिएसपी(Direct Second Year Pharmacy), B.Arch. या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक ३ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक सीईटीची अधिकृत वेबसाइट www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने () विविध व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर केले. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नव्हती त्यामुळे २०२१-२२ शैक्षणिक वर्ष विस्कळित होण्यापूर्वी तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात येत होती. सीईटी सेलकडून इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेटमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, लॉ, बीएड-एमएड अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्यावरही सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या नव्हत्या. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु होईल. बीए, बी-कॉम, बीएसस्सी अशा पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया कॉलेजस्तरावर पूर्ण होऊन, कॉलेज सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे वर्गांमध्ये नियमितपणे तासिका होत आहे. दरम्यान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना देखील सुरुवात झाली आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अशा पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांनी सीईटी सेलच्या वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nN9vn3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments