देशाात किती टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी दिली. देशातील ९२ टक्के झाल्याची माहितीही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी शाळा सुरू होण्याचा आढावा घेतला. देशात वेगाने लसीकरण होत असल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये सुरळित वातावरण निर्माण व्हावे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय संस्थांमधील ९६ टक्के शिक्षण कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. देशातील शैक्षणिक संस्थांमधील ८६ टक्के शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा आढावाही या वेळी घेण्यात आला. ‘देशात वेगाने सुरू असलेले लसीकरण पाहाता शाळा, शैक्षणिक संस्था आणि कौशल्यविकास संस्थांमध्ये वातावरण सुरळित होण्याची चिन्हे आहेत, असे ट्वीट प्रधान यांनी केले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोव्हिडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी अनेक राज्यांनी ऑक्टोबरमध्ये शाळा सुरू केल्या होत्या; पण एप्रिलमध्ये दुसरी लाट आल्यानंतर शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. आता गेल्या चार महिन्यांपासून राज्यांमध्ये शाळा सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, छत्तीसगड, आसाम, बिहार आणि राजस्थान आदी राज्यांमध्ये सर्व वर्ग सुरू झाले आहेत. जम्मू-काश्मीर, ओडिशा, अरुणाचल, गोवा, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये नववी ते १२वीचे वर्ग सुरू झाले आहेत. लडाख, गुजरात, पंजाब, नागालँड आणि झारखंड या राज्यांमध्ये सहावी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. पश्चिम बंगाल आणि मणिपूरमध्ये अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नववी ते बारावीचे वर्ग १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. मणिपूरने मात्र अद्याप काहीही घोषणा केलेली नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mFr09v
via IFTTT

Post a Comment

0 Comments