Also visit www.atgnews.com
पहिली ते चौथीचेही प्रत्यक्ष वर्ग? मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय अपेक्षित
म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यात करोनाची साथ आटोक्यात आली असून महाविद्यालये आणि पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. यानंतर आता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचीही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला आहे. आज, गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले. राज्यात आता जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही वर्गात बोलावण्याबाबत चाइल्ड टास्क फोर्स अभ्यास करीत होते. त्यांनी केलेल्या शिफारशींबाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी माहिती दिली. लहान मुलांसाठी अटी पाळून शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याचे टोपे म्हणाले. सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ना हरकत दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होईपर्यंत नियम व अटी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. करोनाबाधित रुग्णांची स्थिती अशीच कमी राहिल्यास निर्बंध आणखी शिथिल केले जातील, असेही टोपे यांनी सूचित केले. सावधगिरी हवीच जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशात डेल्टा विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील संसर्गाकडे आपण बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, असे टोपे म्हणाले. लग्न समारंभ, धार्मिक ठिकाणी, राजकीय सभांमध्ये गर्दी वाढत आहेत. लोकांमध्ये बिनधास्तपणा वाढत आहे. जगातील तीन देशांमध्ये तिसरी लाट घातक ठरत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नाट्य-सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने? नाट्यगृह, सिनेमागृहांना आता ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. परिस्थिती सुधारली तर या निर्बंधांबाबतही सकारात्मक विचार करता येईल. मात्र त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्यात प्रतिदिन ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीला ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहतील, असे त्यांनी सांगितले. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FRbv5n
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments