Also visit www.atgnews.com
ICSI CSEET नोव्हेंबर परीक्षेचा निकालासंदर्भात महत्वाची अपडेट
CSEET : इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे (Institute of Company Secretaries of India, ICSI) सीएसईईटी निकाल १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. आज आयसीएसआयतर्फे नोव्हेंबर सत्राच्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ICSI परीक्षेचा निकाल २०२१ अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. आयसीएसआयतर्फे आधीच नोव्हेंबर परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळेची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार आज संध्याकाळी ४ वाजता अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकाल अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपला निकाल पाहू शकतात. परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या आदल्या दिवशी ICSI ने विद्यार्थ्यांना परीक्षा पॅटर्न समजण्यासाठी मॉक टेस्टचे आयोजन केले होते. यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार आपल्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने निकाल पाहू शकतात. यासाठी उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ICSI CSEET Result 2021: असा तपासा निकाल उमेदवारांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu. वर जा. होमपेजवर 'CSEET नोव्हेंबरचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा' असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. (थेट लिंक दुपारी ४ वाजता सक्रिय होईल) नोंदणी क्रमांकासह तुमच्याकडे मागितलेले क्रेडेन्शियल्स भरा आणि लॉगिन करा. तुमच्या स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा. महत्वाची माहिती निकालासोबत प्रत्येक उमेदवाराच्या गुणांचा विषयवार तपशील ICSI द्वारे प्रसिद्ध केले जाईल. हा तपशील उमेदवारांना पोस्टाने पाठवला जाणार नाही. हा तपशील डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ICSI CSEET निकाल २०२१ च्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटवरील अपडेट पाहणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nvP3Ir
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments