Also visit www.atgnews.com
Indian Constitution बाबत 'या' खास गोष्टी प्रत्येक देशवासियांना माहिती असाव्यात
Indian : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. पण याआधी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पहिल्यांदाच औपचारिकपणे स्वीकारण्यात आली. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो. या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील अशाच १५ खास गोष्टी सांगत आहोत, ज्या एक भारतीय म्हणून आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेची विशेष वैशिष्ट्ये १) मुळात भारतीय राज्यघटना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिली गेली होती. २) बनवण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. ३) भारतीय राज्यघटनेच्या इंग्रजी आवृत्तीत एकूण १ लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत. ४) भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हाताने लिहिलेली आहे. भारताचे संविधान प्रेम बिहारी नारायण रायजादा (भारतीय कॅलिग्राफर) यांनी इटॅलिक शैलीत लिहिले आहे. ५) भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक पान शांतिनिकेतनच्या कलाकारांनी सजवले आहे. ६)भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हीलियम वायूने भरलेल्या काचेच्या पेटीत भारतीय संसद भवनाच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये अतिशय सुरक्षित आणि अनुकूल जागेत ठेवण्यात आली आहे. ७) भारतीय संविधानाच्या पहिल्या मसुद्याला अंतिम रूप देण्यापूर्वी सुमारे २००० दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. ८)भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात जोडण्यात आले होते. ९) भारतीय संविधान २५ भागांमध्ये एकूण ४७० कलम आणि १२ अनुसूची आहेत. १०)भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ११) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांना संबोधले जाते. राज्यपालांना अधिक अधिकार देण्यासाठी ते घटना दुरुस्तीच्या बाजूने होते. या विषयावरील चर्चेदरम्यान डॉ.आंबेडकरांनी तर ‘संविधान जाळणारा मी पहिला माणूस असेन’ असे म्हटले होते. १२) भारतीय राज्यघटनेला ‘Bag of Borrowings' असेही म्हटले जाते. कारण त्यातील बहुतांश तरतुदी अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, सोव्हिएत युनियन, आयर्लंडसह इतर देशांच्या घटनांनी प्रेरित आहेत. १३) भारतीय संविधान सभेत एकूण २८४ सदस्य होते. त्यापैकी १५ महिला होत्या. १४) भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेपासून प्रेरित आहे. दोघांची सुरुवात ‘We the people’ ने होते. १५) भारताचे संविधान जगातील सर्वोत्तम संविधानांमध्ये गणले जाते. यामध्ये १९५० पासून आतापर्यंत त्यात १०५ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CTkoJM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments