Nashik School: दोनशे दिव्यांग, महिला शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेत दोनशे सहा शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यानंतर शिक्षकवर्गाकडून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद सेवेतील प्राथमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंद पिंगळे यांनाृी ही कार्यवाही पूर्ण केली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेतील २०६ शिक्षकांना शिक्षक या पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली. यावेळी दिव्यांग, महिला, आजाराने ग्रस्त यांना आधी बोलावून पदोन्नती दिल्या गेल्या. त्याचबरोबर पदोन्नतीची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे राबविल्यामुळे पदोन्नती झालेल्या शिक्षकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या पदोन्नती प्रक्रियेमध्ये म्हसकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी, स्वीय सहाय्यक साईनाथ ठाकरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, अधीक्षक श्रीधर देवरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, शिक्षण विभागातील निलेश पाटोळे, संतोष झोले, राम बोडके, विश्वास कचरे, सलीम पटेल, अरुण भदाणे, सुनील सोनवणे, विक्रम पिंगळे, अविनाश अहिरे, दिनेश नन्नावरे, दिनानाथ कुलकर्णी, इम्रान शेख यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत नाशिकचा झेंडा करोना काळात ‘ऑनलाइन शिक्षण योग्य की अयोग्य’ या वादामध्ये न पडता विज्ञान शाखेमध्ये बारावीत शिकणाऱ्या वेदांत कुलकर्णी या युवकाने संयुक्त राष्ट्रांतर्फे (यूएन) युवकांसाठी आयोजित पर्यावरणविषयक परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळविली आहे. इटलीतील एक परिषद आटोपत नाही तोच आता ब्रिटनतर्फे नियोजित परिषदेच्या निमंत्रणाचा मानकरीही तो बनला आहे. विशेष म्हणजे या परिषदेत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होण्याची वाट वेदांतने स्वयंप्रेरणा आणि स्वप्रयत्नाच्या बळावर शोधून काढली. जागतिक स्तरावर होणाऱ्या हवामानविषयक बदलांसंदर्भात त्याने सादर केलेल्या अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे ‘वर्ल्ड लीडर्स समीट’मध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘यांगो’ या ‘हवामान आणि पर्यावरण’ क्षेत्रासाठी ब्रिटन सरकारच्या वतीने परिषदेचे आयोजन ग्लासगो येथे करण्यात आले आहे. या परिषदेत विविध देशांचे पंतप्रधान आणि मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले. या ‘वर्ल्ड लीडर्स समीट’साठीही वेदांत हा भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या परिषदेत सहभाग राहिला. वेदांतचे शिक्षण येवला व नाशिक शहरातून झाले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GYhsyI
via IFTTT

Post a Comment

0 Comments