NEP: प्रादेशिक भाषांमधील टेक्निकल कोर्सला विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या

National Education Policy: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत () प्रादेशिक भाषेतही टेक्निकल अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने () देशभरातील २० महाविद्यालयांना प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान या विविध महाविद्यालयातून यंदा प्रादेशिक भाषांतील टेक्निकल कोर्सला फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक भाषेतून कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची चिंता असल्याचे दिसून येत आहे. २० महाविद्यालयांपैकी १० महाविद्यालयांनी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी हिंदीची निवड केली आणि उर्वरित मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेची निवड केली. AICTE ने ५ प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली आणि मराठी या पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी पुस्तके तयार केली आहेत. त्याचबरोबर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आठ प्रादेशिक भाषांमधील प्रथम वर्षाची पुस्तकेही तयार करण्यात आली आहेत. प्रादेशिक भाषांमधील अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या तांत्रिक महाविद्यालयांमध्ये यंदा अत्यंत निराशाजनक प्रवेश झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही महाविद्यालयांमध्ये केवळ १५ टक्के ते ३० टक्के जागा भरल्या आहेत. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (KEA) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत कन्नडमध्ये इंजिनीअरिंगसाठी राखीव असलेल्या ३० सरकारी कोट्यातील जागांसाठी १७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. राज्यात समुपदेशन सत्र सुरू व्हायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची गरज प्रादेशिक भाषांमध्ये टेक्निकल कोर्स सुरु होण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू याला मिळणारा प्रतिसाद वाढेल असे अधिकारी सांगतात. आता मोजके विद्यार्थीच प्रादेशिक भाषेतील अभ्यासक्रमाची निवड करत असले तरी किमान महाविद्यालये तरी पुढे येत आहेत. एआयसीटीई विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रम शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लोकांची संख्या कुठे जास्त आहे याची पुरेशी माहिती लोकांना अजून मिळाली नसावी. याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत अधिकारी म्हणाले. विद्यार्थ्यांना पुढील वर्षापर्यंत हे अभ्यासक्रम निवडता येतील. अनेक पालक आणि विद्यार्थी प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रम करताना विचार करत असल्याचे महाविद्यालयातील अधिकारी सांगतात. प्रादेशिक भाषेतून कोर्स केल्यानंतर नोकरीची चिंता जयपूरमधील पूर्णिमा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये हिंदी भाषेत कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये बीटेक अभ्यासक्रम सुरु आहे. येथे आतापर्यंत ६० जागांपैकी केवळ १५ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. हा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे नसल्याचे संस्थेचे संचालक दिनेश गोयल यांनी सांगितले. आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना नीट सांगू शकलो नाही, असे दिसते. विद्यार्थ्यांमध्ये अजूनही अनेक शंका आहेत. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना ते प्रोग्रामिंगचा भाग हिंदीत करू शकतात यावर विश्वास बसत नाही. शिवाय अभ्यासक्रमानंतर इंडस्ट्रीत पुढे काय होणार? याची चिंता त्यांना सतावत आहे. येत्या काही वर्षांत प्रादेशिक भाषेतील अभ्यासक्रम अधिक लोकप्रिय होतील, अशी आमची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FNRWea
via IFTTT

Post a Comment

0 Comments