नीट पीजी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; केंद्राने SC कडे मागितला ४ आठवड्यांचा अवधी

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील समुपदेशन फेरी लांबणीवर पडली आहे. आर्थिक दुर्बल गट (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC)प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. केंद्र सरकारने यावेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सरकार ८ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेचा पुन्हा आढावा घेणार आहे. या प्रक्रियेसाठी चार आठवड्यांचा अवधी लागेल. परिणामी समुपदेशन प्रक्रिया चार आठवडे लांबणीवर टाकण्यात आली आहे. पीजी प्रवेशांसाठी EWS / OBC कोट्यात आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. डी.वाय. चंद्रचूड, सूर्य कंद आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r9zwQH
via IFTTT

Post a Comment

0 Comments