Also visit www.atgnews.com
TET 2021: 'स्मार्टफोन' ओळखणार परीक्षार्थी! शिक्षक पात्रता परीक्षेसाठी निर्णय
म. टा. प्रतिनिधी, नाशिक सलग तीन वेळेस लांबलेली आणि दीड वर्षानंतर होणारी महाराष्ट्र (Maharashtra ) आता 'स्मार्ट' झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील ४३ केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेचे पूर्णत: व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल. परीक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून, परीक्षार्थींना फक्त प्रवेशपत्र आणि ओळखपत्र बाळगण्यास परवानगी आहे. विशेष म्हणजे, परीक्षार्थीच्या ओळखीबाबत साशंकता वाटल्यास प्रवेशपत्रावरील 'क्यूआर कोड' स्कॅन केला जाईल. त्यामुळे 'स्मार्टफोन'द्वारे परीक्षार्थींची खात्री केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि. २१) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. त्यासाठी नियमावली कठोर करण्यात आली आहे. परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी कार्बनलेस उत्तरपत्रिका वापरण्यात येणार आहे. गोपनीय साहित्य संकलन ते परीक्षा केंद्र, वर्ग आणि संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाईल. कोणत्याही परीक्षार्थीला केंद्रात मोबाइल, कॅल्क्युलेटर, पेजर कॅमेरा, डायरी किंवा इतर साहित्य नेण्यास मनाई आहे. परीक्षेपूर्वी वीस मिनिटे केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे. तर, परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवरून दिलेले प्रवेशपत्र आणि शासकीय मूळ ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. या परीक्षेसाठी निवडलेल्या केंद्रांना शनिवारी (दि. २०) झोनल अधिकाऱ्यांसह सहाय्यक परीक्षकांनी भेटी दिल्या. त्या ठिकाणच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याबाबतचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाकडे देण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षा सुरळीत होईल, अशी खात्री प्रशासनाने दिली आहे. पेपर - केंद्र - वेळ - परीक्षार्थी पेपर १ - ४३ - सकाळी १०.३० ते दुपारी १ - १५,१४४ पेपर २ - ३८ - दुपारी २ ते ४.३० - १३,५७७ ...अशी आहे यंत्रणा मुख्यालयाच्या ८ किमी अंतरात ९ विभाग आहेत. त्यासाठी परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती गठित केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, सर्व शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, गटविकास आणि गटशिक्षण अधिकारी, सहाय्यक परीक्षक समितीमध्ये आहेत. नियंत्रण कक्षात उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी आहे. दोन्ही पेपर मिळून २८ हजार ७२१ परीक्षार्थी आहेत. झोनल अधिकारी, सहाय्यक परीक्षक, भरारी पथके, जिल्हा नियंत्रण कक्ष तैनात आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. संशय आल्यास, संबंधित परीक्षार्थीची ओळखीची खात्री 'स्मार्टफोन'द्वारे क्यूआरकोड स्कॅन करून केली जाईल. - राजीव म्हसकर, नोडल तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HH9udJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments