मतदान करण्यासाठी एक तास सवलत मिळण्याबाबत शिक्षणमंत्र्यांकडे विनंती

मुंबईतील सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज सोसायटीच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १ तासाची सवलत द्यावी अशी मागणी सेकेंडरी स्कूल्स एम्प्लॉइज सोसायटीने शालेय वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. १८ डिसेंबर रोजी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली आहे. सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. केडिट सोसायटी लि. मुंबई ही संस्था महाराष्ट्र राज्यातील अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची पगारदार सहकारी पतसंस्था आहे. संस्थेच्या महाराष्ट्र राज्यात एकूण २२ शाखा असून संस्थेने एकूण ३१४७९ सभासद आहेत. संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२१ ते २०२६ या कालावधीसाठीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होवू घातलेली असून १८ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. संस्थेच्या सभासदांना सविंधानानुसार त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना १ तासाची सवलत देण्यात यावी ही विनंती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे केली गेली आहे. सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील यांनी या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांना पत्र दिले आहे. मुंबईतल्या पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून मुंबई पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरु करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. मुंबई शिक्षण विभागातर्फे सर्व शालेय मुख्याध्यापकांना पत्राद्वारे यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सुरक्षितपणे शाळा सुरु कराव्यात असे यामध्ये म्हटले आहे. राज्यात एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. मात्र ओमायक्रॉन या करोना विषाणू प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण क्षेत्रातून प्राथमिक शाळा सुरू करण्याची आग्रही मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतर शहरांमधील शाळांबाबतचा निर्णयही लवकरच जाहीर केला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ylACdW
via IFTTT

Post a Comment

0 Comments