UPSC IES ISS Result 2021: आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल () जाहीर केला आहे. IES परीक्षेत अभय जोशी प्रथम आला आहे. त्रिश्ला सिंह आणि आरती गर्ग यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा रँक पटकावला आहे. ISS परीक्षेत अमित कुमार हा उमेदवार पहिला आला असून अर्का मोंडल आणि मनीष कुमार यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन निकाल तपासू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २६ पदे भरली जाणार आहेत. १६ ते १८ जुलै २०२१ या कालावधीत झालेली लेखी परीक्षा आणि २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ या कालावधीत झालेली मुलाखतींची फेरी या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला.केंद्रीय लोकसेवा आयोगाने ८ एप्रिल २०२१ पासून IES आणि ISS परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय आर्थिक सेवा परीक्षेत एकूण ३१ उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात आले होते. तर भारतीय सांख्यिकी सेवेत एकूण २२ उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. पुढील पद्धतीने पाहा निकाल - - निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट .gov.in ला भेट द्या. - वेबसाइटच्या होम पेजवर What's New या पर्यायावर जा. - आता अभियांत्रिकी सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2021 च्या लिंकवर जा. आता अभियांत्रिकी सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा ISS परीक्षा, 2021, अंतिम निकाल या लिंकवर क्लिक करा. - येथे निकालाची PDF फाईल उघडेल. - आता तुमच्या विभागाच्या पेजवर जा. - येथे तुम्ही तुमचा रोल नंबर आणि नावाच्या मदतीने निकाल तपासू शकता. - आता निकालाची PDF फाईल डाऊनलोड करा. रिक्त जागांचा तपशील या भरती प्रक्रियेंतर्गत पदांतर्गत (UPSC IES/ISS भर्ती 2021), एकूण २६ पदांची भरती केली जाईल. यामध्ये भारतीय आर्थिक सेवेची (IES) १५ पदे आणि भारतीय सांख्यिकी सेवेची (ISS) ११ पदे निश्चित करण्यात आली आहेत. या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना भारतीय आर्थिक आणि सांख्यिकी संबंधित विभागांमध्ये नोकरीची संधी मिळेल. यूपीएससीने नोटीसमध्ये म्हटले आहे की, तीन उमेदवारांचा तात्पुरता निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे, आयोगाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत UPSC द्वारे ऑफर जारी केली जाणार नाही. शिवाय, उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांनी उपलब्ध होतील. उमेदवारांना निकालासंबंधी काही प्रश्न असल्यास ते ०११-२३३८५२७१/३३८११२५ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pXLkTV
via IFTTT

Post a Comment

0 Comments